सुंदर मी ही
सुंदर मी ही
गंध फुलांचा तू, अत्तर मी ही
गोड गुलाबी तू, सुंदर मी ही
स्पर्श तुझा होता, मोल वधारे
पारस आहे तू, पत्थर मी ही
मेघ नभाचा मी, तू जलधारा
ओल तुला नसता, बंजर मी ही
बेचव जगण्याला, रंगत आली
स्वाद मधाचा तू, साखर मी ही
वादळवा-यांची भीड कुणाला
धीट खलाशी तू, बंदर मी ही
भूक कुठे शमते, या अफवांची?
भाकर त्यांची तू, लंगर मी ही
दोष तुझा नाही, प्राक्तन दोषी
अंत तुला आहे, नश्वर मी ही

