प्रेमवेडी ही कहाणी
प्रेमवेडी ही कहाणी
मी दिवाणा, तू दिवाणी
प्रेमवेडी ही कहाणी ॥ध्रु.॥
ऐकले तू फूल आहे
मोगरा वा जासवंदी
काळजाने जाणले पण
तू असावी रातराणी ॥१॥
मी दिवाणा, तू दिवाणी
प्रेमवेडी ही कहाणी
मेघ आहे मी नभीचा
सावळासा बावरासा
तू नदीचे वाटते मज
वाहणारे संथ पाणी ॥२॥
मी दिवाणा, तू दिवाणी
प्रेमवेडी ही कहाणी
चंद्र माझा, रात्र माझी
मी तुझा, तू आज माझी
सूर छेडू भारलेले
गात जाऊ गोड गाणी ॥३॥
मी दिवाणा, तू दिवाणी
प्रेमवेडी ही कहाणी

