STORYMIRROR

Shobha Wagle

Inspirational

4  

Shobha Wagle

Inspirational

शान भारताची

शान भारताची

1 min
241

भारताचा शेतकरी

सदा राबतो शिवारी

संगे ढवळ्या पवळ्या

शेत त्याचे तो नांगरी.


मृग नक्षत्र येताच

वाट पाहतो ढगाची

पेरणीला सुरुवात

धान्य बिया लावण्याची.


आया बाया पोरं त्याची

काम करती शिवारी

धान्य खूप येई शेती

जाई विकण्या बाजारी.


आहे पोशिंदा जगाचा

बळीराजा भारताचा

अभिमान तिरंग्याचा

सदा राखतो झेंड्याचा.


शान आहे भारताची

तीन रंग तिरंग्याचे

आहे प्रतिक कार्याचे

भाग्योदय भारताचे.


श्वेत रंग शांततेचा

रंग नारिंगी धैर्याचा

समृध्दिचा तो हिरवा

मध्ये अशोक चक्राचा.


आरे चोवीस चक्राचे

गतीशील राहण्याचे

सुजलाम् सफलाम्

देश सदा राखण्याचे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational