Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

VINAYAK PATIL

Inspirational

3  

VINAYAK PATIL

Inspirational

शाळेतले दिवस

शाळेतले दिवस

1 min
237


शाळेतले दिवस म्हणजे रम्य ते बालपण 

आणि यातूनच आलेलं खरेखुरे शहाणपण 


शाळेतले दिवस म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा 

शाळेतले दिवस म्हणजे आपल्या मित्रांची एकनिष्ठा 


शाळेतले दिवस म्हणजे एकीचे एक उत्तम उदाहरण 

शाळेतले दिवस म्हणजे कर्तव्यनिष्ठतेचे अनुकरण 


शाळेतले दिवस म्हणजे सामान्य विश्वातलं असामान्य विश्र्व 

शाळेतले दिवस म्हणजे आयुष्याचे सर्वस्व 


शाळेतले दिवस म्हणजे आपल्या आवडत्या तासाची वाट पाहणे 

जर कोणी गैरहजर असेल तर पी टी च्या तासाची मागणी करणे 


शाळेचे दिवस म्हणजे घालण्यात आलेला तो धुमाकूळ 

पकडलो गेलो तरी नाव कोणाचे घ्यायचे नाही हे एकच मूळ 


शाळेतले दिवस म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत निभावणारी आपली मैत्री 

शाळेतले दिवस म्हणजे जीवन जगण्याची खात्री 


म्हणूनच म्हणतो शाळेतले आपले दिवस हे लई भारी 

अन् त्याहूनही आपली शाळा साऱ्या जगात न्यारी 

साऱ्या जगात न्यारी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational