STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Children

4  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Children

शाळा-कविता

शाळा-कविता

1 min
1.1K

शाळा जीवंत विचार 

शाळा संस्काराचा आगार 

तिच्या अगाध ज्ञानाने 

मिळते जीवनाचे सार 


शाळा माझी आई 

शाळा माझे विचार 

तिच्या आचरणाने मिळते 

जीवनाची मूल्ये थोर 


 शाळा शिक्षणाचे दार 

शाळा मुलांमुलींचे घर 

कुटूंबाचे वात्सल्य देते 

प्रेमाची छाया त्यांच्यावर 


शाळा माझे बालपण 

शाळा माझे जीवन 

तिच्या कुशित वाढतो 

जन्मो जन्मीची आठवण 


शाळा माझी शिस्त 

शाळा माझा अभिमान 

तिच्या संगतीत शिकतो 

घेऊन निसर्गाचे शिक्षण 


शाळा शिक्षणाचा खजिना 

शाळा खरा विश्वास 

भिती नसते कुणास 

सुखी करते जगास 


शाळा सुंदर जग 

शाळा अज्ञानावर मात 

व्हावे शिकून साक्षर 

सारी मूल्ये विद्येत 


शाळा मोठा ग्रंथ 

शाळा खरी साथीदार 

ठेवा विश्वास तिच्यावर 

सरेल आयुष्यातील अंधार


शाळा मायेचा जिव्हाळा 

शाळा आपली जीवनकला 

रोज,रोज यावे शाळेत 

शाळा फुलवी जीवनमळा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract