STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Romance

2  

Ramkrishna Nagargoje

Romance

सेल्फी

सेल्फी

1 min
181

नजरेचे तीर मोठे,

मोजता हृदयाचे ठोके

ऐक तू कर्ण देउनी,

किती ऐकले,?

सांग मला.


पाय चालती कसे,

पायी पैंजण चमकते,

चालणे तुझे देखणे,

किती चालले पाय,?

सांग मला.


हाती चमकते बांगडी,

मनगटी , पिवळी,

हातावर मेहंदी,

तूझे शब्द मखमली,

चमकते आकाशी चांदणी,

तशी तू माझी परी,

होशील का ?

सांग मला.


ही मुद्रा सुवर्णाची केली,

मन गुंतून घडवली,

कळीसारखे बोट तुझे,

स्पर्श बोटाचा तुझ्या,

देशील का,? सांग मला.


हे हार फुले कोवळी,

गळा शोभतील बरी,

अक्षदा पिवळी,

वाटून झाली,

तू मला आता,

एक हसरी,

सेल्फी देशील का ?

सांग मला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance