STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Romance Others

4  

Prashant Tribhuwan

Romance Others

सौंदर्याचा साज

सौंदर्याचा साज

1 min
478


तुझ्या गालावरची खळी

तुझ्या सौंदर्याचा साज

सांग आता तरी मजला

माझी होशील का आज ?


तुझी ती निरागसता

अन् तो मासूम पणा

टाकतो मोहवून मला

अन् माझ्या या मना


तुझ्या त्या खळीमध्ये

आवडेल भुलून जाण्या

तू असता समोर माझ्या

मन भरून पाहण्या


बनवताना तुजला

तो भगवंतही भुलला

तुझ्या खळीबरोबत

सारा आसमंत फुलला


तुझ येणं आणि जाणं

जसा ऊन सावलीचा खेळ

हृदयाचा आपल्या

होईल सांग कधी मेळ



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance