STORYMIRROR

शिवांगी पाटणकर

Action Others

3  

शिवांगी पाटणकर

Action Others

सैनिक

सैनिक

1 min
200

बलिदानावर ज्यांच्या तिरंगा फडकतोय

जीवाची न करता पर्वा तो देशासाठी लढतोय

आहे भारतमातेचा वरदहस्त त्याच्या पाठीवर

गाजवतोय पराक्रम तो रणभूमीवर

जातो सामोरा टाकणाऱ्यांस देशावर वाकडी नजर

दाखवतो भारतीय जवान आहेत किती निडर

देश रक्षणार्थ राहतो रात्रभर जागत

म्हणून आपण असतो घरी शांत झोपत

रात्रंदिवस सीमेवर देत असतो पहारा

आहे खंबीर तो देशाचा सहारा

शत्रूशी लढताना असते त्याच्या डोळ्यात आग

शौर्याने त्याच्या पाडतो शत्रूला हरावयास तो भाग

लढतोस मातृभूमीसाठी हरपून भान

देशाला साऱ्या तुझा सार्थ अभिमान               


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action