सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले
जिच्यामुळे शिकले दीन दुबळ्याची मुली अन मुले !
ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले !! धु !!
होता स्वातंत्र्य पूर्वीचा तो काळ !
महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार !!
त्यांच्यासाठी तिने ज्ञानाचे द्वार केले खुले !! १ !!
ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले !!
महिला शिक्षणाची किंमत तिला कळली होती !
म्हणून तर अंगावर झेलली चिखल अन माती !!
धर्माच्या ठेकेदाराला आव्हान तिने दिले ॥ २ ॥
ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले !!
पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मिळवून दिले स्थान !
वाढविला जगती महिला वर्गाचा सन्मान !!
स्त्री शिक्षणासाठी तिने आपले आयुष्य वाहिले!! ३ !!
ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले !!
जिच्यामुळे शिकले दीन दुबळ्याची मुली अन मुले !
ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले !! ध्रु !!