साथ
साथ
अजूनही शांत बसलो की, मन एकाग्र होते.
जुन्या आठवणीत, थोड धडपडत चालते.
आधी सगळे कस छान होत, शाळा, खेळ आणी बालपण होते.
जाणता झालो की श्रापच लागला, आता मुकेपणी पाहण्याचे बोलपण होते.
वाटायचे सगळे मिळाले, आता अजून काही मिळवायचे नव्हते.
भीती गमवायची होती, नेमके तेच पहायचे नव्हते.
झाल तसेच आणी तेच, ज्याची कधी सवय नव्हती.
आता जे काही उरलय, फक्त त्याचीच महिती होती.
तू होतीसच इतकी सुंदर, चूक तुझी काहीच नव्हती.
मोहिनी मला आठवली, भूक माझीच होती.
आठवतो काही काळ आणि क्षण, जी भावूक होती.
उठण्याची ताकद त्यानीच दिली, तेवढी साथ तुझीच होती.

