साथ
साथ
तुझे हासू बनून मला तुझ्या,
चेहऱ्यावर सजायचे आहे
तुझ्या प्रत्येक सुख दुःखात,
मला साथ तुला द्यायची आहे
कुशीत तुझ्या शिरून,
स्वप्न उदयाची बघायची आहेत
"फक्त आपण दोघे " चांदन्यात,
हातात घेऊन फिरायचे आहे
ओंजळीत तुझ्या अमाप सुख टाकायचे आहे.
दुःख येईल तुझ्या वाटयाला तेव्हा,
मला तुझी ढाल बनायची आहे
कधी तुझ्या डोळयात सखे,
येणार नाहीत अश्रू
"नेहमी आपण एकमेकां सोबत असू"
प्रेम माझं खर आहे,
कसला ही हा बनाव नाही
नात इतकं सुंदर आपलं,
कोणत्याच चौकटीच त्याला कुंपण नाही
समाप्त

