साथ
साथ
मी लहान होते तेव्हा पहिल्यांदा मी त्याला पाहिले..
पाहिल्यावर घाबरले..पण..,
पप्पांनी सांगितले की इथून पुढे हाच तुझ्यासोबत कायम असणार...व तुझी साथ देणार.
मग हळूहळू त्याची सवय होत गेली...
जसं जशी मी मोठी होत गेले..
तस तशी त्याची नी माझी मैत्री घट्ट झाली..
तो रोज माझ्यासोबत असायचा...
माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट वेळेत त्याने कायम माझी साथ दिली..
माझ्या हातात कायम त्याचाच हात असायचा..
रोज रात्री आठवणीने माझ्याकडे यायचा व मला बोलायचा सांग बरं आज काय घडलं..
मग मी त्याचा हात धरून सगळं लिहून काढायचे..
असंच एक दिवस माझी मैत्रीण मला म्हणाली...,
कोण गं तो..? कायम त्याच्याबद्दल सांगते.. की त्याने माझी अशी साथ दिली.. कधीच मला एकटं सोडलं नाही..
मग मी त्याचा हात माझ्या हातात घेतला.. व सांगितलं..
की माझी कायम साथ देणारा माझा सोबती.. म्हणजे
पेन...