एक किरण मला आवडला
एक किरण मला आवडला
आयुष्याच्या नव्या वाटेवर
एक मार्ग मला सापडला
धुंद अशा प्रकाशातला
एक किरण मला आवडला..
होता तो खूप छान
रूप त्याच आकर्षक
वर्तन त्याच खूपच सुंदर
दर्पण त्याच मनमोहक
सकाळ - दुपार समोर असायचा
तरी आठवण यायची संध्याकाळी
सगळं काही रोजचंच असायचं
चाहूल लागायची प्रत्येक वेळी
काम - काम करत असायचा
करायचा विचार दुसऱ्यांचा
मी तर ते सगळच गमावलं
जेव्हा पाहिलं तुला पहिल्यांदा
धाक - भिती वाटत राहिली
नाही बोलला मनमोकळ
समोर असायचा धीर मिळायचा
आता जाणार लांब तर वाटलं संपलं सगळं..
दवाने ओलसर आरश्यावार
जेव्हा नाव लिहायचे मी त्याचं
आस फक्त एकच असायची*
आज ना उद्या येईल तो इथं
असेल तो सोबत जाईल मी तिथं
मिळेल त्याची साथ राहील मी तिथं...*
*धुंद* *अश्या प्रकाशातला एक किरण मला आवडला...*
*एक किरण मला आवडला...*
