मिस करणे
मिस करणे
तू नसलास तरी तू आहे असं वाटणे..
मग सारखा तुझा आभास होणे..
हळूच गालातल्या गालात हासने...
मग तू सोबत असतानाचे ते क्षण डोळ्यासमोर दिसणे.
अन् मग हळूच त्या आठवणीत रमणे...
*काय यालाच म्हणतात मिस करणे...*??
चालताना तू सोबत नसतानाही सोबत आहे असे वाटणे..
मग हळूच मागे वळून पाहणे..
हळूच मनाला समजावणे... की मागे कोणीच नाही हे...
सगळे अजबजुला आहे तरी काहीतरी शोधणे...
*काय यालाच म्हणतात मिस करणे...*??
आठवण