STORYMIRROR

priyanka fatak

Others

3  

priyanka fatak

Others

जीवन

जीवन

1 min
11.8K

कसही झालं तरी 

जीवन जगायचं असत...

मोडलेल छप्पर पुन्हा 

बांधायचं असत...

वादळ वाऱ्याला कधी

घाबरायच नसत...

तुफानाशी टक्कर देण्यातच 

खरं जगणं असत...

मेरू बांधणाऱ्या मुंगिकडून 

शिकायचं असत..

अन् भर पावसात बी घरट्यात

चारा आणणाऱ्या मातेच्या भावनांना

जपायच असत...

कितीही आले जीवनात संकट 

तरी घाबरायच नसत...

अपयशाला डावलून 

यशाच्या शिखराला गाठायच असत..

आयुष्यात अनेकदा पडलो म्हणून

खचून जायचं नसत...

तर

पुन्हा नव्या उमेदीने लढायचं असतं...

कसही झालं तरी

जीवन जगायचं असत..

जीवन जगायचं असत...


Rate this content
Log in