STORYMIRROR

priyanka fatak

Others

3  

priyanka fatak

Others

जबाबदारी

जबाबदारी

1 min
12K

जेव्हा जबाबदारीचं ओझं नकळत खांद्यावर पडतं...

तेव्हा नकळत आयुष्य खूप काही शिकवून जातं...


ज्या खांद्यांना आयुष्याचा भार काय असतो...

हे माहीतदेखील नसत, तेच खांदे सगळा भार पेलून नेतात..

तेव्हा कुठतरी असं वाटतं की खरंच आयुष्य आपल्याला शिकवतंय..


कधी न अनुभवलेले ते प्रसंग अचानक उद्भवतात व त्यांना तोंड देण्याचं सामर्थ्य कुठून येतं माहित नाही...

पण तेव्हा कुठेतरी असं वाटतं की आयुष्य खूप काही शिकवून जातं..


जबाबदारीचं ओझं पेलता पेलता जीवन जगणं हातातून सुटून जातं..

पण....

तेव्हा कुठेतरी असं वाटतं की आयुष्य खूप काही शिकवून जातं...


हे लिहायला कसं सुचलं माहित नाही...

पण यातही आयुष्य मला खूप काही शिकवून गेलं...


Rate this content
Log in