साथ सोडणार नाही
साथ सोडणार नाही
तूच म्हटला होतास साथ सोडणार नाही
प्रतारणा कधीही माझ्याशी तू करणार नाही
जीवनाचे आराखडे होते तुझे निराळे
कधीच का मला ते कळलेच नाही
प्रेमाची तुझ्या रितच रे न्यारी
भावना माझ्या तुला कळल्याच नाही
सत्य ते की भास म्हणू मी
हरखून गेले कधी समजलेच नाही
अंतरंगात तुझ्या डोकावताना
माझी मी कशी, आता उरलीच नाही
वाटेकडे तुझ्या डोळे आसुसलेले
आशा मनीची मी, साथ सोडणारे नाही

