साथ मनी झुरली
साथ मनी झुरली
शब्दात वदता भाव तू सोबतीस रात्र जागली
अंतरी कोलाहल कसला साथ तुजसाठी झुरली
क्षण हळव्या मनीचिया आस नी कुस बदलली
भाव गुंतता चिंतेशी आसक्तित सांजही झुरली
आज एकली वाटते सावली तुझ्यामाझ्यातली
मोहमनी वादळे काहूनी श्वासात आभा ती झुरली
काहूर मनी दाटता अबोल नातीही ती जपली
चिंतता काहूर मनी या सांज तुजसाठी झुरली
सोबतीस सांज एकली आभा मनी ही पसरली
सथिला होती आज ही ती साथ मनी झुरली

