सात एप्रिल
सात एप्रिल
बाराव्या दिवसाची सांज...!
बारकावे मनाचे शोधताना
रावण अहंकाराचा अंतरी
व्याकुळ झालेला मी पाहिला...
दिलदार पणा हृदयीचा
वळचणीत पडुन स्वतःस
सावरताना मी जाणला...
चिरफाडच झाली
सांगुन सवरून सद्गुणांची
जरा जास्तच सय्यमाची सीमा ताणता...
आता अस्ताचलास जाताना
तो ही जरा हसला
म्हणाला कळले का रे तुला
जीव संसारी कसा रे हा फसला..!
