STORYMIRROR

Jyoti gosavi

Inspirational

4  

Jyoti gosavi

Inspirational

सारे करूया नेत्रदान

सारे करूया नेत्रदान

1 min
412

कोणी असती जन्मांध

 कोणाला होतो अपघात 

 तो एक अपघात करतो

 त्यांच्या आयुष्याचा घात


आयुष्यामध्ये फक्त काळोख

 डोळ्यापुढे अंधारी रात्र 

त्या भयानक काळोखात

 शिथील पडती सारी गात्र


कोणी मागती रस्त्यात भीक

 कोणाचा संसार मोडतो

 हाकलून देती घरातूनही

 कोणी आपला जीव सोडतो


त्यांच्यासाठी करु कीलकीले

 एक दार उजेडाचे

जरी तुम्ही द्याल त्यांना

 दान तुमच्या नेत्राचे


मरणानंतर सारी सृष्टी

 पहा आपल्या डोळ्यांनी

दुसऱ्यांनाही द्यावी दृष्टी

 आणिक आपल्या डोळ्यांनी


तुमच्या डोळ्यांची एक बाहुली 

जन्मांधाची बने साऊली

विज्ञानाचा करुनी सन्मान 

करूया सारे नेत्रदान

करूया सारे नेत्रदान


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational