STORYMIRROR

Shivam Madrewar

Fantasy Inspirational

4  

Shivam Madrewar

Fantasy Inspirational

साप्ताहिक सुट्टी

साप्ताहिक सुट्टी

1 min
58

कारखान्यातून कागद घराकडे निघाले,

अर्ध्या रस्त्यामध्ये पावसात ते भिजले,

त्याचे पाय चिखलामध्येच अडकले,

आणि कागद साप्ताहिक सुट्टीवरती गेले


स्वल्पविराम चहागाळणीमध्ये अडकले,

पुर्णविराम घरात विश्रांती घेत बसले,

उद्गारवाचक चिन्हाने ताजमहाल पाहिले,

आणि विरामचिन्हे साप्ताहिक सुट्टीवरती गेले


नाटककाराने शब्दांना बोलावले,

लेखकांनी त्यांना पुस्तकामध्ये लपवले,

कवींना त्यांना काव्यामध्ये आमंत्रण दिले,

आणि शब्द साप्ताहिक सुट्टीवरती गेले


सहीसाठी मंत्र्याने लेखणी हातात धरले,

बँकेमध्ये त्याला सुतळीने बांधले,

साहित्यकाराने त्याचा सन्मान केले,

आणि लेखणी पण साप्ताहिक सुट्टीवरती गेले


कपाटामध्ये धुळ खात पुस्तके बसले,

दिवसभर त्या वाचकांची वाट पाहिले,

परंतु साहित्यकारानेच त्यांना पुजले,

आणि पुस्तके पण साप्ताहिक सुट्टीवरती गेले


काळोख्या अंधाराचा त्याने खात्मा केले,

ज्ञानाचा बीज त्यानेच जमिनीत पेरले,

परंतु स्वत: मात्र बाटलीमध्येच राहिले,

आणि शाई देखील साप्तहिक सुट्टीवरती गेले


आयुष्यभर त्याचा रंग तो काळावले,

विद्यार्थ्यांना त्यानेच जोरात पळवले,

त्याचा रंग जबरदस्तीने आता बदलले,

आणि फळ्याने देखील साप्तहिक सुट्टीसाठी अर्ज केले


लहाणपणी प्रत्येकाने पाटीवरती पाढे लिहीले,

त्याच्यावरतीच आम्ही वळणदार अक्षरे काढले,

पण त्याचे काम आता त्या दुरध्वनीने हातात घेतले,

आणि लाकडाची ती पाटी साप्ताहिक सुट्टीवरती गेले


अज्ञानाची ज्योत साहित्यानेच विझवले,

प्रत्येकाचे जीवन त्याने अतिशय सुंदर केले,

परंतु मानवाने त्याचे समारोप केले,

आणि साहित्य देखील साप्ताहिक सुट्टीवरती गेले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy