सांज आसवांची
सांज आसवांची
पुन्हा केली तुजला आर्जवे माझ्या फुलांनी
अजून एक सांज तेव्हा भिजली आसवांनी
सांजावले नभा शामरंग कवळून गेले
भास तुझे किती अनामिक जवळून गेले
बोलाविले मी किती पण मज टाळले सुखांनी
अजून एक सांज तेव्हा भिजली आसवांनी
मी श्वास घेतले जे ते ही तुझेच होते
तुझे नाकारणे मलाही जुनेच होते
का हृदयवाक्य माझे नाकारले त्या मनांनी
अजून एक सांज तेव्हा भिजली आसवांनी
धरे आणली कितीदा मी माझी प्रीतस्वप्ने
अन् दाविली तुला तारकांची प्रीतरत्ने
त्या चांदण्यांस माझ्या ग्रहण लावले ऊन्हांनी
अजून एक सांज तेव्हा भिजली आसवांनी
