"सांग तू आहेस का?
"सांग तू आहेस का?


मनातल्या काळोखात जपले नाते
आजही तूझ्या माझ्या आठवणींचे
आठवतात मला आजही नेहमी
दिवस तेच, आपल्या बालपणीचे//१//
सांग तू आहेस का? कुठे?
बऱ्याच वर्षांनी, दिसली नाही
तुझी हाल खुशाली मला
कित्येक दिवसांची कळली नाही//२//
असा दिवस, एकही नाही
आठवण तुझी आली नाहीं
हृदयात माझ्या, प्रसन्न छटा
दूर तू मी पडलो एकटा //३//
मन माझे विचार करते
तू आहेस की नाही आता
कुठवर चालणार असले सत्र
येईल की नाही? तुझे एक पत्र//४//