जीवन एक रंगमंच
जीवन एक रंगमंच
1 min
180
जीवन एक रंगमंच आहे
सुख दुःखांचा एक संच आहे
कधी सोनेरी स्वप्ने या जीवनात
कधी होतात हाल, अतोनात !!१!!
भविष्याची चिंता सतावते
जगताना जीवन माणसाला
क्षण आनंदाचे पाहण्यासाठी
झोकून देतो संकटात स्वतःला !!२!!
जीवन एक आशा असते
उद्याचे भवितव्य पाहण्यासाठी
सोसून अपयशाचे भयाण निखारे
करतो धडपड माणूस जगण्यासाठी !!३!!
दूर आसतात सुखाच्या वाटा
आशेच्या दिशेनं धावणाऱ्या लाटा
काय लिहिलं आहे भाळी?
निनादेल कधी आनंदाची भूपाळी.!!४!!
