स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
आपलाच भारत, आपुलेच जन
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सण
कुठं उपोषण, कुठे कुपोषण
वाढती महागाई, आणि प्रदुषण !!१!!
आजही बेरोजगारी, आणि बेकारी
मग काय कामाची असून हुशारी
वरचेवर भरती होई आपो आप
सोसतो झळा, बेकारीच्या निष्पाप !!२!!
अनेक गोष्टींचे, व्हावे निरसन
करुन सारे विचार मंथन
भारतात आपल्या, घडावे परिवर्तन
बेकारास नोकरी, द्यावी आवर्जुन !!३!!
बेकार किती, नोकरीस किती
याची करावी, नित्य गणती
भुकेल्यास भाकरी,गरजवंतास नोकरी
हिच स्वातंत्र्याची ठरेल सीमा खरी !!४!!
अमृत महोत्सव होईल साजरा खरा
जेंव्हा येईल सुख गरीबा घरा
निनादेल स्वातंत्र्याची आनंद भूपाळी
खरी साजरी होईल स्वातंत्र्य दिवाळी !!५!!
अमृत महोत्सव हा स्वातंत्र्याचा
आहे हक्क प्रत्येक भारतीय माणसाचा
देशास नेण्यास पुढे नित्य श्रमावे
भारत भूमि पुढें नतमस्तक व्हावे. !!६!!
