STORYMIRROR

Janardan Gore

Others

3  

Janardan Gore

Others

"करू नका रे शब्दांचे वार"

"करू नका रे शब्दांचे वार"

1 min
154

"करु नका रे शब्दांचे वार"

करुन नको ते विचार "बेसुमार"

करू नका रे शब्दांचे वार

ज्याने होईल, बावरे मन बेजार

आणु नये मनात असे विचार...

करु नका रे शब्दांचे वार..||१||


शब्द वैभव चांगले साठवा

बोल चांगले आपले आठवा

शुद्ध मन, शुद्ध विचार

करु नका रे शब्दांचे वार..||२||


गोड बोल अमृता परी असावे

सर्वांना एकसमान समजावे

रुसवे फुगवे द्या, ढकलून दुर..

करू नका रे शब्दांचे वार ||३||


मन परिवर्तनाचे, शिकावे धडे

निनादेल सदा, आनंदाचे चौघडे

सदा निर्मळ, आचार विचार...

करु नका रे शब्दांचे वार ||४||


उच्च प्रतीची,असावी विचारसरणी

व्यापारी असो किंवा राजकारणी

असावा मनी, दयेचा सागर...

करू नका रे शब्दांचे वार. ||५||



Rate this content
Log in