STORYMIRROR

Janardan Gore

Others

3  

Janardan Gore

Others

पहाट

पहाट

1 min
135

नवी पहाट, नवी वाट

घेऊन आली, रम्य प्रभा

गोड लागते, ऊब थोडीशी

रवि किरणे, वाढविती शोभा ||१||


दवबिंदूत न्हाली सारी धरणी

किलबिलाट एकाहून एक सरस

जागली पक्ष्यांची कोकिळा राणी

कुहू, कुहु गात रम्य गाणी ||२||


नयनरम्य दृश्य मनोहारी भासते

स्वच्छंद आभाळ सारे खुलते

निसर्गाची किमया, दिसतें न्यारी

बंद कळीतून , फुल फुलते ||३||


रान वेली, झाडे झूडपे 

सारेच कसे, नवे दिसतें

प्रसन्न होते,धरणी सारी

स्वागत जणू, पहाटेचं करते ||४||



Rate this content
Log in