STORYMIRROR

Janardan Gore

Others

3  

Janardan Gore

Others

रक्तदान शिबिर

रक्तदान शिबिर

1 min
242

साध मच्छर चावल तर आपण त्याला लगेच यमसदनी पाठवितो. एवढे रक्ताला जपणारी माणसे 350 ml रक्त 10 ते 15 मिनिटांत पटकन रक्त संकलन पेढीला देवून आणि प्रमाणपत्र घेऊन मोकळे होतो. नंतर त्या रक्ताचा आपण विचार देखील करत नाही. आपले संकलित केलेलं रक्त खरंच गरजवंताला दिलं जातं की, त्याचा समजून उमजून व्यवसाय केला जातो. संकलित केलेल रक्त गरजवंताला देताना त्यात अडवणूक न करता पैशांमध्ये रुग्णाला गरजेनुसार सूट पेढ्यानी द्यायला हवी. रक्त संकलन ही खरी काळाची गरज जरी आहे. पण त्यात काटेकोर नियोजन करण्यात यायला पाहिजे. जेणेकरून गरीब गरजवंत रुग्णांना याचा लाभ घेता येईल.मोफत संकलित केलेलं रक्त हे अडवणूक न करता किंवा जास्तीच्या रकमेची मागणी न करता रुग्णांना देण्यात यावे असे मला वाटते.

   रक्तदान सर्व श्रेष्ठ दान ज्याने एखाद्या व्यक्तीला जीवनदान मिळतं, त्याच रक्ता अभावी कुणाला प्राणास मुकावे लागले तर रक्त संकलन करून काही उपयोग होणार नाही. त्यासाठी रक्ताचा पुरवठा वेळेवर होईल याची दक्षता सर्व रक्त संकलन पेढ्यानी घ्यायला हवी.

   

रक्त आहे जीवन संजीवनी

रक्त देताना नको खंत मनी

प्राण येतील परतुनी रुग्णांचे

"रक्तदान"मोठेपण आपल्या मनाचे !!१!!


Rate this content
Log in