सोनेरी पहाट
सोनेरी पहाट
1 min
197
डोंगराच्या माथ्यावर सुर्य उगवला
सोन्यासारखा सोनेरी, उजेड पडला
अरूंद नागमोडी एक पाऊलवाट
गावामधून निघते, जाते थेट डोंगरात !!१!!
सूर्याच्या भोवती, आभाळ पिवळे
सोनेरी पहाटेनं, नेसले सोवळे
हिरवाई ने नटली ती पायवाट
डोंगराच्या कुशीत, झाडी घनदाट !!२!!
गवतामध्ये हिरव्या,घरे उभी कौलारू
झाडे झुडुपे डोलती मंद वाहे वारू
सप्त रंगात न्हाली, सोनेरी पहाट
जगाहून वेगळा पहा निसर्गाचा थाट !!३!!
