जीवनाचे वस्र
जीवनाचे वस्र
जीवनाचे वस्त्र, परिश्रमाने विणावे
श्रमांच्या क्षणांना, अभिमानाने गुणावे
घेताना श्रम प्रभु स्मरण करावे
मरावे परि कीर्ती रूपाने उरावे !!१!!
सुखदुःखांच्या धाग्यांची रेशीम गाठ
भक्तीचा माठ, भरून काठोकाठ
मन शांतीसाठी, भक्तीची कांती
घडेल जीवनी,नवीन उत्क्रांती !!२!!
सोज्वळ मनाने, करून दान
प्रपंचाचे ठेवून नित्य भान
उदार मनाने द्यावी भिक्षा
रूंदावेल दान धर्माची कक्षा !!३!!
जीवनाचे वस्त्र, परिधान करावे
संसार सागर, जतन करावे
एक रुप ठेवून चित्त
विचाराने खर्चावे आपले वित्त !!४!!
