STORYMIRROR

Janardan Gore

Others

3  

Janardan Gore

Others

रिमझिम पाऊस - ५

रिमझिम पाऊस - ५

1 min
129

रिमझिम पाऊस बरसत होता

एक एक ढग गर्जत होता

सायंकाळची वेळ होती

सुरू झाडांची चळवळ होती//१//

रात्र किड्यांची कीर कीर

पाखरांची सुरू भिर भिर

उड्या मारी बेडूक राव

आवाज करतो डराव,डराव//२//

चिंब ओला रस्ता पार

प्रसन्न सारा आवार झाला

आला श्रावण सरी घेऊन

जातो दुःखी मनाला आनंद देऊन//३//

रिमझिम पावसात वारा शांत

गोठ्यात गायी निवांत, करीत रवंथ

उसळुन आल्या, सागराच्या लाटा

शोधू लागल्या पळवाटा//४//

आला श्रावण, घेऊन सनं वार

प्रसन्न झाला सारा आवार

अशी श्रावण सरींची बात

श्रावणाने प्रसन्न वाटते मना,मनात


Rate this content
Log in