STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

4  

Sakharam Aachrekar

Romance

सांग मी हरवून कोठे जातो ?

सांग मी हरवून कोठे जातो ?

1 min
2.0K

गीत आज समोर तुझ्या, या प्रश्नासाठी गातो

डोळ्यात तुझ्या पाहता, सांग मी हरवून कोठे जातो? 


ना उमगली किमया मला त्या, चंचल मृगनयनांची

निश्चल कमलफुलांशी, केली तुलना मी त्यांची

कोण असे ती मृगनयनी, असे पुसले मी तारकांशी

होती परी ती विसावणारी, स्वप्नातल्या दूरदेशी

विचारतो तुला कोठूनी हा भास मजला होतो? 

डोळ्यात तुझ्या पाहता, सांग मी हरवून कोठे जातो? 


नजरेतून तुझ्या सांग प्राशितो, मदिरा मी कोणती

श्वास तुझे गीत प्रेमाचे का, कानी माझ्या सांगती

साज दिसे तुझ्या साधेपणीही, सांग कशी तुझी कांती

पाहता प्रतिमाही पडे मला, तुझ्या नयनांची भ्रांती

तुला भेटण्या स्वप्नातूनही, आतुर का मी होतो? 

डोळ्यात तुझ्या पाहता, सांग मी हरवून कोठे जातो? 


हे कमलनयनी तुझ्या नयनतीरांनी, घायाळ मी झालो 

सरोजसरोवरी तुझ्या लोचनीच्या, गुंतून मी गेलो 

तुझ्या मुखीच्या शब्दसुरांनी, चिंब चिंब मी न्हालो

पुन्हा पाहाण्या तुझ्या लोचना, इथवर मी आलो 

मला पाहता तुझ्या मुखावर, नवा रंग का येतो? 

डोळ्यात तुझ्या पाहता, सांग मी हरवून कोठे जातो? 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance