STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational

2  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे

1 min
15K


होते शिवशाहीर

प्रसिद्ध साहित्यसम्राट अण्णाभाऊ

गुणगान गाऊ

स्मृतीदिनी...


अण्णाभाऊ साठे

होते पूर्ण निरक्षर

महाराष्ट्राचा शाहीर

प्रसिद्ध...


लेखन त्यांचे

सशक्त आणि समृद्ध

लोकनाट्य प्रसिद्ध

तमाशाचे...


तमाशाला प्रतिष्ठा

मिळवून दिली अण्णाभाऊंनी

पोवाडे लावणी

रचिल्या...


२१ कथासंग्रह

लिहिल्या ३० कादंबरी

प्रसिद्ध कादंबरी

फकीरा...


मिळाला पुरस्कार

१९६१ साली फकीरास

उत्कृष्ट फकीरास

शासनाचा...


वैजयंती कादंबरीत

चित्रण केले शोषणाचे

कलावंत स्त्रियांचे

अण्णाभाऊंनी...


माकडीचा माळ

भटक्या-विमुक्त समाजाची

दखल साहित्याची

घेतली...


तुकाराम भाऊराव

होते ऊर्फ शिवशाहीर

पोवाड्यात माहीर

अण्णाभाऊ...


अण्णाभाऊ साठे

काव्यप्रकारचे अभ्यासक

उत्तम लेखक

अण्णाभाऊ...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational