Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Surekha Chikhalkar

Inspirational Others

4  

Surekha Chikhalkar

Inspirational Others

साहित्य लेखणी

साहित्य लेखणी

1 min
677


चहू दिशांनी मिळून आले

विचारांचे मोती,

एकाच माळेत गुंफून घ्यावे

सदा आयुष्यभरासाठी ,

अहो भाग्य आम्हा लाभले

साहित्य लेखणीसाठी....


सुख दुःखाचे सगेसोयरे

जणू कुटुंब भासती ,

साहित्याची देवाण घेवाण

झाली स्टोरीमिरर वरती ,

शब्दांनाही पंख फुटले

नकळत जुळली नाती....


स्टोरीमिररचा प्रवास गुंफताना

शब्द अपुरे पडती ,

कित्येकांना देतात साथ

काळजाला हात घालती ,

देऊन विषय वेगवेगळे

साहित्य आमचे वाढती....


नाते आपले समईसारखे

अखंड तेवत राहती ,

सदा राहो सहवास आपला

नावाजेल कौतुकाची थाप ती ,

स्टोरीमिररचे देणे आम्ही

शतदा आभार मानू किती...


चहू दिशांनी मिळून आले

विचारांचे मोती.....


Rate this content
Log in