सागरी किनारा ,षडाक्षरी कविता
सागरी किनारा ,षडाक्षरी कविता
झोन्बतो अंगाला
सांज गार वारा
भावतो मनाला
सागरी किनारा
जाहल्या वेंधळ्या
अधिर या लाटा
खेळता मनाशी
अंगावरी काटा
सागर किनारी
सांज न सकाळी
भेटीस येशील
शंका मन जाळी
भाव ते तरल
गुंजन अवेळी
जरा वेडावली
सांज ती भोळी
अश्या या सांजेस
फिरुनी ये लाटा
रततो उगा का
आठवांचा काटा
केशरी रंगारी
खेळतो चित्राशी
जणू चित्र काढी
प्रिती सागरा शी
माऊ रेतीत या
पावलं उमटे
खुण त्या प्रितीची
मनी तुझ्या पटे
स्पर्शीता रेणुस
चाल मंदावली
लाटा गुन्जे कानी
आस थंडावली
मन गुंतले हे
सागर किनारी
सुंदर घरटे
असावे किनारी

