STORYMIRROR

vaishali Deo

Abstract

4  

vaishali Deo

Abstract

साधना

साधना

1 min
417

साधना,श्रीकृष्णाच्या बासरीचे मुलायम सुर


साधना, मिरेच्या भजनांचे आर्त काहूर


साधना ,अहिल्येची तपस्या


साधना,शबरीची आस्था


साधना,एक समीक्षा


साधना, एक निदीध्यास


साधना ,आकाशाची विस्तीर्णता


साधना, मनाची अविचलता


साधना, एक समर्पण


साधना, अर्पण केलेली भावना


साधना, अंतरीची वेदना


निर्गुणा कडे जाण्याचा मार्ग म्हणजे साधना


प्रकाशाचा शोध घेणे म्हणजे साधना


साधना हा ज्ञानाचा मार्ग


साधनेनेच शोधावा इंद्राचा स्वर्ग


चित्त शुद्धीकरण म्हणजे साधना


चेतनेचा ध्यास घेत केलेली प्रार्थना


साधनेतच मानवता, साधनेतच निर्वाणता



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract