STORYMIRROR

Smita Murali

Romance

3  

Smita Murali

Romance

रुपाचं चांदणं

रुपाचं चांदणं

1 min
5.2K


मला भुलवितं सख्या

तुझ्या रुपाचं चांदण

तुझ्या नावानं कपाळी

मी रे गोंदलंय गोंदण


तुझ रुप हे देखणं

तू रे पुनवेचा चंद्र

तुझ्यापुढे रे फिका

आज वाटतोय इंद्र


माझ्या ह्रदयातला तू

अढळ शुक्राचा तारा

तुझ्या आठवणीचा

वाहे वादळी वारा


माझ्या सख्यासोबती

तू रे माझा श्वास

तुझ्यासवे संसारी

गोड प्रेमाचा घास


तुझ्या रुपाच्या चांदण्यात

सखी निघाली न्हाऊन

गोड गालात लाजली

तुला जवळ पाहून


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance