STORYMIRROR

Ajay Birari

Romance

2  

Ajay Birari

Romance

रुप यौवना

रुप यौवना

1 min
7.0K


काजळ नयनी भाळी कुंकुम माळुन गजरा सजली तू.

सोडत जातो सुस्कारे मी कशास इतकी नटली तू.

झगमग झगमग पेहराव अन ग‍ाली ओठी तव लाली.

दागदागिने अंगावरती ल्याली सारे असली तू.

वेषभुषा अन केशभुषेसह कटाक्ष तिरपा पाहून ग

घुमू लागले भ्रमर भोवती जेव्हा हलके हसली तू.

बघत राहिलो तुझ्याकडे मी विसरुन देहा भा‍नाला.

स्वप्न की सत्य कळले नाही रंभा सुंदर दिसली तू.

दिवसा रात्री उठता बसता पडू लागले स्वप्न तुझे.

वसली प्रतिमा तुझीच नयनी हृदयी माझ्या ठसली तू.

मनात होते तुझ्यासवे मी प्रेमसागरी डुंबावे.

स्वर्गहि उरला दोनच बोटे जेव्हा मजला पटली तू.

जपेन तुजला फुलासारखा सुखी ठेवण्या झटेन मी

शब्द न माझा खरा वाटला वचनासाठी रुसली तू.


Rate this content
Log in