कविताचोर
कविताचोर

1 min

1.5K
कविता चोरी वर सिनाजोरी
माझीच म्हणून मिजासखोरी.
निवडुन कविता बरवी खास
दाविती कवी असल्याचा भास.
सृजनाने कवितेस देतो जन्म.
जन्म देऊनी कवी होतो धन्य.
कविता देतो रसिकांच्या हाती
दाद मिळवितो मग फुलते छाती.
कविता कवीचे अपत्यच असते.
कविताचोरांच्या ते गावी नसते.
विरहदु:ख कवीचे अपार असतो
अपत्यचोरी पेक्षा कमी ते नसतं.
कवी अजय असो वा हृदयमानव
चोरांना काय, ते तर अकलेने दानव.
व्हाटसअप यांचे खुले मैदान.
निती विसरुनी ते होती बेभान.
वाड़मय चोरी अपराध महा
खुन बलात्कार तत्समच हा
हरामखोरांना नसते सीमा
नसते त्यांना कसलीच तमा.