माझे बाबा
माझे बाबा

1 min

7.0K
माझे बाबा होते तेव्हा महत्व त्यांचे कळले नाही
कौतुक त्यांचे करण्याला मन माझे वळले नाही.|१|
कामी येती आज त्यांचे आद्यात्मिक ते संस्कार.
त्या संस्कारांमुळेच आज मी करतो यशस्वी संसार.|२|
कठोर वागणे बालपणी मज उगाच वाटे त्यांचे भय.
चुकलो असता कधी जरी मी करीत नव्हते माझी गय.|३|
काळजी होती मनात त्यांच्या बाहेर कधी दिसत नसे.
आजारी पडलो असता त्यांना झोप रात्रीची येत नसे.|४|
बाहेरुन ते कडक होते पण आतून होते प्रेमळ खूप
साधी राहणी होती त्यांची रुबाबदार होते त्यांचे रुप.|५|
आज जगी ते नसतांना आठवण त्यांची करी उदास
जगात वावरतांना त्यांचा क्षणोक्षणी मज होतो भास.|६|