मराठी गझल
मराठी गझल

1 min

6.8K
तुला शोधतांना विरह साहतो मी
समुद्रा किनारी तुला पाहतो मी
हृदयमंदिराची निनादे ग घंटा
मनाच्या महाली तुला चाहतो मी
तडफडे जलाच्या अभावी ग मासा
सुखाच्या अभावी तसा राहतो मी
विसरुनी मला दूर लोटू नको ना.
सुमन जीवनाचे तुला वाहतो मी.
मला लागला छंद या शायरीचा.
मराठी गझल सागरी नाहतो मी.