प्रेमभावना
प्रेमभावना
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
7.0K
भरारतो हा वारा गार
थरारते ही काया फार
यौवनाने मुसमुसलेली
मुक्त आज मी नार नवार.||धृ||
उंबरठ्यावर तारुण्याच्या
आज पहा मी उभी असे
जिकडे बघते तिकडे मजला
प्रतिबिंब माझे मला दिसे.||१||
सावळाच हा मेघ विचारी
काय तुला ग झाले आज
तारुण्य उसळते ऐकू येते
सागर लाटांची ही गाज.||२||
Advertisement
>
तुडूंब भरला मेघ जलाने
रिता करी त्यास वारा गार
दाटुन आली प्रेमभावना
सजणासाठी नटली नार.||३||
धावत सुटली सरीता वेगे
तिज ओढ सागर प्रेमाची
तसेच काही भासे मजला
हुरहुर अनामिक ओढीची.||४||
निसर्ग मला गूढ भासतो
श्रावणातल्या बघून सरी
ऊनसावली खेळामधे
भिजण्याची ही मजा खरी.||५||