शृंगार
शृंगार

1 min

1.2K
सजले सजणा तुम्हासाठी
आली ही मंतरलेली रात्र
आतुर झाले मिलनास मी
सज्ज झालीत सारी गात्र.
वाट बघते मी किती दिसांची
काय करु थकले लोचन राया
निरोप तुमच्या हो आगमनाचा
येता झंकारली माझी हो काया.
रात्रीचा हा फुलला हो निशिगंध.
काया सुवासाने झालिया बेधुंद.
रातीमागुन राती जाती वाया
तुम्हासाठी सजली माझी काया.
मला बघुन झाला तुम्ही दंग
आता इष्काचा चढतोया रंग
पडली इष्काची रात्रीवर छाया
तुम्हासाठी सजली माझी काया.