STORYMIRROR

Shreyash Shingre

Inspirational

4  

Shreyash Shingre

Inspirational

ऋतु

ऋतु

1 min
212

मंद हवेचा नाद

संग पावसाचा तो गंध

इंद्रधनूच्या लाटेवरती 

स्वार सातही रंग


कोसळणारा तो पाऊस

संग भिजलेल्या त्या वाटा

स्वैर बेभान होऊन येती

तव सागराच्या त्या लाटा


ग्रीष्मामधला सूर्य जेव्हा

तळपती आग ओकतो

घामाच्या त्या धारांनी

हैराण करन सोडतो


वेध लागतात सणांचे 

जेव्हा जवळी येतो श्रावण

सारे काही क्षणांत भिजवून

करतो सृष्टी पावन


शरदातील टिपूर चांदणे

आणि अंगी बोचतो वारा

थंडी भरते तनामनात

होई स्वछंद आसमंत सारा


शिशिरातील पानझड ती 

अधिकच मोहक वाटते

पुन्हा एकदा सज्ज होण्यास

सारे झाड पिंजून काढते


जुनेपणावर पुन्हा एकदा 

नवेपणाची झालर चढते

वसुंधरेच्या अधरावरती 

सहा ऋतुंचे गाणे फुलते


झाडे वेली पशु पाखरे

जेव्हा घेतात शांत नीज

निसर्गातल्या मनामनात

रुजे वात्सल्याचे बीज


ऋतु असती हे असेच अवखळ 

येती आणि जाती

सुख दुःख असते क्षणिक असेच 

हे मानवाच्या पोटी


ऋतु म्हणजे असते 

छान निसर्गाचे ते चित्र

सृष्टीच्या नियमांमधलं

एक सुंदर असे सूत्र


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational