रस्ता उनाचा...
रस्ता उनाचा...
चालतो आहे कधी एकटाचा, आहेत मोठाली स्वप्न मनात.
आता येऊदी कसा ही काळ, रस्ता पार करील मी त्या उनात.
झालो कधी तरी मग निराश, पाणी येईल हळू डोळ्यात.
मोठा श्वास असा घेऊन, कामाला लागेल थोडं कणत.
कष्ट करायची तयारी माझी, अशी यशाची ती गाणी गात.
आता येऊदी कसा ही काळ, रस्ता पार करील मी त्या उनात.
नसेल भान अन जाण मनाला, जग जगते कोणत्या सणात.
प्रवास आहे माझा आणवानी, एकटा जगतो एकाकी वनात.
कश्याला कोणाची उणीधुनी काढू, व्यस्त असतो स्वतःच्या कामात.
आता येऊदी कसा ही काळ, रस्ता पार करील मी त्या उनात.
जगतो कधी तरी हळू हसत, माझ्या माझ्याच त्या स्वप्नात.
मातीतून उठलो मी, अस्तित्व शोधतो कानाकणात.
प्रयत्नांची पराकाष्टा जिद्दीने, तेव्हा आनंदी दिव्याची तेवते वात.
आता येऊदी कसा ही काळ, रस्ता पार करील मी त्या उनात.
अजूनही बळकट होईल स्वप्न, जेव्हा मिळेल सर्वांची साथ.
विसरलो कठीण काळ, तर नक्कीच बिघडेल नशिबाची गत.
सत्याची साथ घेऊन चालणाऱ्यांचा, खडतर असतो साराच पथ.
आता येऊदी कसा ही काळ, रस्ता पार करील मी त्या उनात.