ऋणानुबंध
ऋणानुबंध


जन्मताच नातेबंध
जुळे माझ्या कुटुंबाशी
आईबाबा दैवत ते
गोड बोलावे त्यांच्याशी.
छान ऋणानुबंध हे
नाते जमले मायेचे
बालपण सुखातले
छान स्मरण आईचे.
कधी होती भेदभाव
राग रोष भडकती
प्रेम बंध त्या नात्यांचे
अन् मैत्रीचे जुळती.
रक्ताहुनी श्रेष्ठ माया
असे मेत्रीच्या प्रेमाची
सख्खे भाऊ वैरी होई
पण मैत्री ती मायेची.
वाटे ऋणानुबंध हे
कोणी जोडले माझ्याशी
पूर्वजन्माच्या नात्याचे
बंध अवीट प्रेमाशी.