STORYMIRROR

Gangadhar joshi

Romance

4  

Gangadhar joshi

Romance

ऋणानुबंध

ऋणानुबंध

1 min
443

आंब्याच्या मोहराला कोकिळेचा साद

सांग प्रिये सांग मला कसा ऋणानुबंध ।। धृ ।। 

तुझी काया माझी माया

जीव लागे झुरावया 

किती पाहु वाट तुझी

सांजवेळ जाती वाया

कृष्णा च्या बासरीचा राधेला ग छंद    ।।1 ।।


श्रावणातील मेघधारा 

वेड्या मोराचा फुले पिसारा

वाऱ्याच्या लहरीनेही सुटला सुगन्ध  ।। 2 ।।


दिव्य प्रीती दिव्य ज्योती

उजळल्या प्रेम वाती

 युगानुयुगे हे गीत गाती  

पश्चिमेचा शुक्रतारा झाला मंद मंद ।।3 ।।

शिव शक्तीचे तेज आहे हाती

जिवा शिवशी अद्वैत नाती

म्हणूनच जगते अखंड धरती 

सृजनाचे गीत गाता सजला अनुबंध      ।।4।।


झरती झिरपती रात्रीची वात

निसर्गाची मिळते त्याला एक साथ

उघड गुपित हे जरी निज सत्य

चराचरी हे सर्व काही वंद्य 

सांग प्रिये सांग मजला कसा ऋणानुबंध ।। 5 ।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance