रंगुनी रंगात
रंगुनी रंगात
(काव्यांजली प्रकार)
रंगुनी रंगात
होळीच्या शुभ सणात
खूप आनंदात
खेळुया.....१
होळी पौर्णिमेला
नैवेद्य पोळीचा देवीला
नारळ अग्नीला
आशीर्वादा.....२
होळी पेटवुनी
जोरात बोंबा मारणे
क्रोध घालणे
होळीत......३
धुळवड लावुनी
शुभेच्छा देती होळीच्या
एकमेका प्रितीच्या
लोकांस....४
रंगांची उधळण
एकमेका रंग लावुनी
भांग पिवुनी
नाचती......५
आनंदी वातावरण
सर्वांचे उल्हासित मन
आनंदी सण
होळी........६
