रंगपंचमी-गीत
रंगपंचमी-गीत
सण रंगपंचमीचा आला
उधळण रंगाची करू चला
रंग नको रे,घातक जीवांना
निसर्गाचा आधार घेऊ चला
आनंद सणाचा लुटू चला
पानांफुलांचा रंग बनवू या
मिळूनी सारे एक होऊ चला
रंग निसर्गाचा वापरू चला
रंगीबेरंगी उत्सव मोठा
भिजल्या अंगावर रंग ओतू या
सारे रंगात न्हाऊ चला
आनंद रंगाचा घेऊ या
हिरवी पाने पुष्कळ लिंबाची
त्यातून हिरवा रंग बनूवू चला
पाणी मिसळून त्यास उधळूया
अंघोळ रंगांची करू चला
गुलाबी रंग गुलाबी फुलांचा
खुशाल तुम्ही फेका रंगांना
धुऊन जाईल कचरा सारा
नाही होणार इजा डोळ्यांना
यारे सारे न्हाऊ यारे
रंग निसर्गाचा वापरू चला
मंत्र मुग्ध होऊन, ठेका धरू या
आनंद सणाचा लुटू चला
नको चिखल माती
नको रे खडे,रेती
डोळे जाईल जीवांचे
बिघडू नका रे मती
संदेश आहे निसर्गाचा
घातक रंग नका वापरू
निसर्गातून रंग बनवा
सर्व आनंद आपण घेऊ
