रंग उधळू प्रेमाचे
रंग उधळू प्रेमाचे
सप्तरंगी रंगाची छटा
वेड लावी मनास
विविध रंगाची महती
सांगे येऊन आम्हास
प्रीतीचा रंग उधळून
आपुलकीचा महोत्सव
खुलून यावा अंतरंग
प्रेमाचा होवो उत्सव
लाल गुलाबी नारंगी
रंग रंगाशी बोलते
प्रीतीचा रेशमीबंध
एक एक धागा जोडते
प्रेम मनाची भावना
रंगा रंगाची किमया
अलौकिकतेचा मर्म
स्वप्नांची नवी दुनिया
गंधाळलेली प्रीत जणू
हर एक रंगाची व्यथा
लाल गुलाबी ओठांवर
शीतलतेची प्रेम कथा